संतापजनक..! १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून प्रेग्नेंट केले, मुलीने दिला बाळाला जन्म..! लोणारची घटना....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार शहरातून धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला प्रेग्नेंट करण्यात आले, पिडीत मुलीने एका बाळाला जन्म दिला असून त्याच्यावर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार बुधवारी सायंकाळी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात एका नवजात बाळाला घेऊन एक व्यक्ती आला होता. त्याबद्दल विचारणा केली असता लोणार शहरातील एका अल्पवयीन मुलीने या बाळाला जन्म दिला असून या बाळाचा सांभाळ करण्यास ती सक्षम नसल्याचे सांगत बाळाला उपचारासाठी आणले होते, मात्र डॉक्टरांनी आधी पोलीसांत माहिती देण्याचे सांगितल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने प्रकरणाचा तपास हाती घेतला. 
लोणार पोलिसांत गुन्हा दाखल...
याबद्दलची माहिती लोणार पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी नवजात बाळाच्या अल्पवयीन आईचा शोध घेतला. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून एका आरोपीविरुद्ध बलात्कारासह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन आईसह नवजात बळावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.