अंढेरा पोलिसांनी अवैध धंद्यांवर उगारला आसूड! ठाणेदार विकास पाटलांच्या नेतृत्वात दारूवाल्यांविरोधात पोलीस सुसाट.....

 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंढेरा पोलिसांनी अवैध धंदेवाल्यांविरुद्ध कारवाईचा आसूड उगारला आहे. ठाणेदार विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंढेरा पोलीस दोन नंबर वाल्यांच्या विरोधात सातत्याने कारवाई करत आहेत.काल,१२ सप्टेंबरला देखील पोलिसांनी शिवणी आरमाळ, शेळगाव आटोळ, देऊळगाव घुबे अशा वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया केल्या.
 शिवणी आरमाळ येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारला. यावेळी जुगार खेळवणाऱ्या मनुबाई येथील दिंगबर आत्माराम बोर्डे याच्यावर कारवाई करण्यात आली. शेळगाव आटोळ येथे वरली मटक्यावाल्या मनोहर धर्मा बोर्डे याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. देऊळगाव घुबे येथे देशी दारूची चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या भगवान नामदेव काळे याच्याविरुद्ध कारवाई करून त्याच्याकडून देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
ही कारवाई ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश जारवाल, गजानन वाघ, गणेश देढे, गोरख राठोड, कैलास उगले, सिद्धार्थ सोनकांबळे , रामेश्वर आंधळे, भारत पोफळे यांनी केली.