मूर्ती शिवारातील ‘आनंद सागर’ धाब्यावर तुफान राडा; दोन गटात हाणामारी; धाब्यातील साहित्याची तोडफोड, परस्परविरोधी तक्रारीवरून सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल...
दरम्यान, याच घटनेबाबत आरोपींपैकी योगेश गोपीचंद चव्हाण (वय २४, रा. नेहरू नगर, ता. मोताळा) यांनीही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ते दि. २८ जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मित्र हर्षल पवार याच्यासोबत आनंद सागर धाब्यावर जेवणासाठी गेले असता, तेथील कामगारांनी जेवण देण्यास नकार दिला. यानंतर वाद होऊन धाब्यावरील मालक व कामगारांनी शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीवरून धाब्यावर काम करणार्या तिघांविरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही गुन्हे बोराखेडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून, दाखल अधिकारी पोहेकॉ. भगवान सुरडकर यांनी नोंद केली आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शेंगेपल्लु यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनेचा नेमका तपशील, वादाचे मूळ कारण व जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
