हमारे साथ चल म्हणत अल्पयीन मुलीचा हात धरुन विनयभंग; जयपूरच्या दाेघांविरुद्ध बाेराखेडी पाेलिसात गुन्हा दाखल !

 
माेताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वैद्यकीय तपासणी करून आपल्या गावाकडे जात असलेल्या अल्पवयीन मुलीला गाठत दाेघांनी हमारे चाथ चल म्हणून हात धरुन तिचा विनयभंग केल्याची घटना २६ ऑगस्ट राेजी घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बाेराखेडी पाेलिसांनी २८ ऑगस्ट राेजी दाेघांविरुद्ध पास्काेसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 
बाेराखेडी पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील १६ वर्षीय मुलगी तिची वैद्यकीय तपासणी  झाल्यानंतर गावाकडे जात हाेती. दरम्यान, शेंबा ते जयपुरचे रोडवर अतुल जुनारे याचे शेता जवळ आराेपी समीर खान जमील खान, व  शेहजाद खान (आइचे नाव अक्लीम खान)  रा. जयपुर हे तिथे दुचाकीने आले. त्यांनी अल्पवयीन मुलीला कहा जा रही हाे, हमारे साथ चलाे असे म्हणून वाईट उद्देशाने तिचा हात पकडला.यावेळी फिर्यादी मुलगी जाेरात ओरडल्याने बाजुच्या शेतात असलेला अतुल जुनारे रा. तांदुलवाडी हे तिथे आल्याने दाेन्ही आराेपी घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बाेराखेडी पाेलिसांनी दाेन्ही आराेपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पीएसआय  राजेंद्र कपले करीत आहेत.