BIG BREKING पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार! बुलडाणा जिल्हा रुग्णालयातून झाला गायब..
Sep 7, 2026, 08:34 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा पोलिस दलाला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. मलकापूर दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी प्रकरणात पकडण्यात आलेला आरोपी पसार झाला आहे. रात्रीपासून जिल्ह्यातले पोलिस आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूर दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार चोरी प्रकरणात एक आरोपी नागरिकांनी पकडला होता. त्याला स्थानिकांनी बेदम चोप दिला होता. काल रात्रीच पोलिसांनी आरोपीला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.मात्र मध्यरात्री नंतर बंदोबस्तावर हजर असलेल्या पोलिसांना चकवा देऊन आरोपी फरार झाला. प्रताप बावरी असे आरोपीचे नाव आहे...पोलिस आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहेत..