कुंभमेळ्याहुन परतताना अपघात! चालकाला डुलकी लागली अन् काळ आला..! एक ठार चार जखमी; समृद्धी महामार्गावर झाला अपघात...

 
 दुसरबीड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :प्रयागराज हून घरी परत असताना चालकाला झोपेची ढोलकी लागल्यामुळे कार अनियंत्रित होऊन साईड बॅरियर ला धडकली. कारला दोन-तीन पलट्या बसल्यामुळे यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील दुसरबीड जवळ घटना घडली.  
 
प्रयागराज येथून आपल्या घरी छत्रपती संभाजी नगर येथे परत जात असताना काल ३ फेब्रुवारी रोजी २ वाजेदरम्यान समृद्धी महामार्गावर दुसरबीड जवळ चायनल नंबर ३२०.७ मुंबई कॅरिडोर वर चालक अक्षय गजानन नराळे याला झोपेची डुलकी लागल्याने कार अनियंत्रित होऊन साईड बॅरियरला धडकली व कारणे महामार्गावर दोन तीन फलट्या मारल्या यामध्ये रूपाली भगवान नराळे वय (४५) वर्ष यांना गंभीर मार लागल्याने यांचा मृत्यू झाला. भगवान देविदास नराळे वय (५५) वर्ष, संजय खंडोबा पवार वय (६५), मंगला संजय पवार वय (६०) चालक अक्षय भगवान नराळे वय (२५) हे जखमी झाले. जखमींना महामार्ग ॲम्बुलन्स तात्काळ उपचाराकरता सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.