

समृद्धीवर अपघात ;एकाच कुटुंबातील दोन ठार तीन जखमी
Apr 12, 2025, 10:06 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कारची ट्रकला मागून धडक लागल्याने अपघात झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर घडली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर कॅरीडोर वर काल ,११ एप्रिलच्या पहाटे तीन वाजता अपघात घडला.
कार चालकाला झोपेची डूलकी लागल्याने हा अपघात झाला. रतन चंदनशिव (७०),गोपाल रतन चंदनशिव (३२) या बापलेकांचा अपघातात दुर्दवी मृत्यू झाला तर राणी गोपाल चंदनशिव (३१) , पूजा रतन चंदनशिव (२९),अर्चना रतन चंदनशिव (६८) या गांभीर जखमी झाल्या आहेत. चंदनशिव कुटुंब वाशीम वरून पुण्याकडे जात होते त्या वेळी हा अपघात घडला.