

समृद्धीवर अपघात! मालवाहू वाहनाने उभ्या वाहनाला पाठीमागून ठोकले; एकाचा मृत्यू एक गंभीर...
Apr 4, 2025, 14:41 IST

बीबी(श्रीकृष्ण पंधे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे सूत्र सुरूच आहे. आज,४ एप्रिलच्या पहाटेही किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. एका मालवाहू वाहनाने उभ्या वाहनाला ठोकले, यात मालवाहू वाहनातील एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. जखमी रुग्णावर उपचार सुरू आहेत..

समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॅरीडोर वर हा अपघात झाला. चिकू घेऊन जाणारे वाहन नागपूरकडे जात होते. यावेळी समोरील वाहनाला धडकून अपघात झाला. यात मालवाहू वाहनातील धनंजय गजानन तायडे याचा जागीच मृत्यू झाला. प्रथमेश हिम्मतराव लहुरकर (रा. बार्शीटाकळी) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरे तपासणीसाठी पाठवण्यात आला.