जिगाव प्रकल्पावर भीषण अपघात;पोकलेनखाली दबून चालकाचा मृत्यू...
Jan 25, 2026, 12:51 IST
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिगाव धरण प्रकल्पाच्या ठिकाणी काम सुरू असलेल्या पोकलेनखाली दबून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २४ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे प्रकल्पस्थळी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात 👆🏻
प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील चंद्रेह येथील राकेशसिंह जमाहीरसिंह गोंड (वय २४) हा जिगाव धरणाच्या कामावर पोकलेन चालक म्हणून कार्यरत होता. पोकलेनमधून डिझेल चोरीस जात असल्याच्या संशयामुळे तो रात्री पोकलेनच्या केबिनमध्येच झोपला होता. सदर पोकलेन मातीच्या ढिगाऱ्यावर उभे करण्यात आले होते.
दरम्यान, बाजूने जाणाऱ्या एका वाहनामुळे मातीचा ढिगारा खचला आणि त्यावर उभे असलेले पोकलेन अचानक घसरले. यामध्ये चालक राकेशसिंह पोकलेनखाली दबला. गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घाटोळ करीत आहेत.