'अभी तेरा क्या करनेका" म्हणत चाकू काढला, पोटावर मारला.. वार चुकला अन्... बुलढाण्याच्या आठवडी बाजारात थरार...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरात टूकार गुंडांची दहशत वाढली आहे. बुलढाण्याच्या आठवडी बाजारात साहिल आणि सलमान नावाच्या दोघांनी दादागिरी केली.. केशव नगरातील सुधीर जाधव यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला..मात्र सुदैवाने वाट चुकल्याने सुधीर जाधव वाचले.. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात सलमान आणि साहिल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  बुलढाण्याच्या आठवडी बाजारात सुधीर जाधव यांचे सुधीर इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान आहे. ते दररोज दुकानात जातात तेव्हा सलमान आणि साहिल त्यांना "ए सुधीर" अशी एकेरी हाक मारतात. घटनेच्या दिवशी रात्री दुकान बंद करून जात असताना सलमान आणि साहिल सुधीर जाधव यांच्याजवळ आले. त्यांनी नेहमी प्रमाणे दमदाटी केली. त्यावेळी तुम्ही माझा अपमान केला तर मी तुमची पोलिसात तक्रार करील असे सुधीर जाधव यांनी सलमान आणि साहिलला सुनावले. त्यावेळी सलमानने अभी तेरा क्या करनेका असे म्हणत सुधीर जाधव यांच्या गळ्याला चाकू लावला आणि गच्ची पकडली. सलमानने सुधीर जाधव यांच्या पोटावर चाकूचा वार केला, मात्र वार चुकवण्यासाठी सुधीर जाधव यांनी सलमान ना ढकलले, त्यावेळी सलमान खाली पडला. यावेळी सलमान सोबत आलेल्या साहिलने देखील सुधीर जाधव यांना मारण्याचा प्रयत्न केला, यावेळी सुधीर जाधव यांच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून पडली.. यावेळी दुकानात कामावर असलेल्या मुलांनी आजूबाजूच्या लोकांनी सुधीर जाधव यांना वाचवले आणि सलमान आणि साहिल तिथून निघून गेले. घटनेची तक्रार सुधीर जाधव यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिली असून सलमान आणि साहिल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...