अंगावर काटा आणणारा व्हिडिओ! तोंडावर स्कार्फ बांधला अन् तिने धावत्या रेल्वेसमोर उडी मारली; शेगाव रेल्वेस्थानकावरील घटना...

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव रेल्वेस्थानकावर काल,४ सप्टेंबरला धक्कादायक घटना घडली. एका २८ वर्षीय विवाहितेने धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सिसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार विवाहिता ही खामगाव तालुक्यातील अटाळी येथील आहे. सौ.अर्चना अनंता महाले(२८) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. अर्चना यांचा विवाह अटाळी येथील अनंता महाले यांच्याशी झाला होता. मात्र काही कारणांमुळे त्या काही दिवसांपासून माहेरी पहुरजीरा येथे राहत होत्या.
काल,अचानक त्यानी टोकाचा निर्णय का घेतला? आत्महत्या कौटुंबिक कारणांमुळे झाली की दुसऱ्या कुठल्या याबद्दल नेमकी स्पष्टता नाही..