खामगाव–अकोला मार्गावर गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला; 33 लाखांचा मुद्देमाल जप्त, ट्रकचालक ताब्यात...
नाकाबंदी दरम्यान एमपी 09 जीएच 8165 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या डीसीएम ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आढळून आला. ट्रकमधून गुटख्याची 50 पोती जप्त करण्यात आली.
या प्रकरणी ट्रकचालक ब्रिजगोपाल गुलजारसिंग यदुवंशी (वय 45, रा. इंदोर) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक पकडत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 22 लाख 46 हजार 400 रुपयांचा गुटखा आणि 10 लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण 33 लाख 46 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 25 डिसेंबरच्या रात्री खामगाव–अकोला मार्गावरील टेंभुर्णा फाट्याजवळ करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाला नांदुरा–अकोला मार्गावरून गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे 25 डिसेंबर रोजी सायंकाळी टेंभुर्णा फाट्याजवळ नाकाबंदी करण्यात आली.