BREAKING बुलडाणा एलसीबीची दमदार कामगिरी! अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या ! बुलडाणा, वर्धा नांदेड, हिंगोली जिल्ह्यात करत होत्या चोऱ्या...

 
Jskdk

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने दमदार कारवाई केली आहे.बुलडाणा,वर्धा ,नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील पोलिसांना जेरीस आणणाऱ्या अट्टल चोरट्याला LCB ने बेड्या ठोकल्या आहेत. दगडूबा मुकुंदा बोर्डे (३५, पेरजापूर, ता. भोकरदन, जि.बुलडाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

३ सप्टेंबर रोजी मेहकर शहरातील एक पान टपरी अज्ञात चोरट्याने फोडली होती. प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून बोर्डे याला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून त्याने चोरलेला मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
अटक करण्यात आलेला आरोपी बोर्डे हा अट्टल गुन्हेगार आहे. यादी त्याने मेडिकल स्टोअर्स, डेंटल क्लिनिक यासह इतर अनेक ठिकाणी चोऱ्या केले आहेत. आतापर्यंतच्या चौकशीत त्याने ६ चोरींची कबुली दिली असून त्याच्या चौकशीतून त्याच्या साथीदारांची नावे देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे. 
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोहेकॉ शरद गिरी, दिनेश बकाले, पुरुषोत्तम आघाव, गजानन गोरले यांनी केली.