

भरधाव पल्सर ऑटोला धडकली; ५ जण गंभीर जखमी! पल्सरवाला पळून गेला; मलकापुरची घटना....
Updated: Dec 26, 2024, 08:45 IST
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):भरधाव प्लसर दुचाकीने - ऑटोरिक्षास जबर धडक दिल्याने - ऑटोरिक्षा पलटी होऊन त्यातील ऑटोचालकासह पाच जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना बोदवड रस्त्यावरील टॉवर नजीक २३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान घडली.
याबाबतची फिर्याद ऑटो चालक अशोक निना वराडे (वय ४७) रा. आळंद यांनी २४ - डिसेंबर रोजी मलकापूर शहर - पोलीस स्टेशनला दिली की, त्यांच्या ताब्यातील ऑटो रिक्षा क्रमांक - एमएच २८-आर ८६३ मध्ये - सवारी घेऊन २३ डिसेंबर रोजी सायंकाळी घराकडे जात असताना सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान काळ्या रंगाची दुचाकी एमएच १९-ईएच ५१६५ या क्रमांकाचा दुचाकी चालक सोपान शांताराम कांडेलकर (वय ४७) रा. रणथम ता. मुक्ताईनगर जि. - जळगाव त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून ऑटोरिक्षाला समोरील बाजूस जबर धडक दिली.
या अपघातात ऑटोरिक्षा पलटी होऊन रस्त्याच्याकडेला खाली पडून वाहनात बसलेले प्रवासी प्रवासी अलका कैलास निकम, कैलास रामधन निकम, सुरेश शामराव अढाव, शोभा जनार्दन भगत ते स्वतः व त्यांची पत्नी अनिता अशोक वराडे सर्व रा. आळंद ता. मलकापूर जि. बुलढाणा गंभीर जखमी झाले. त्यावेळी दुचाकी चालक सोपान शांताराम कांडेलकर हा घटनास्थळावरून पळून गेला. त्यावेळी जमलेल्या काही लोकांनी अम्बुलन्सद्वारे सर्व जखमींना सरकारी दवाखान्यात पोहोचविले. उपचार सुरू असताना प्रवासी सुरेश शामराव अढाव यांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे भरती करण्यात आले आहे. अशा फिर्यादवरून शहर पोलिसांनी पल्सर दुचाकी चालक सोपान शांताराम कांडेलकर याचे विरुद्ध कलम २८१, १२५ (अ), १२५ (व), १३४, १८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास मलकापूर शहर पोलीस उपनिरीक्षक सुनिल घुसाळे करीत आहे....