साखरखेर्डा बस स्थानकावर भरधाव कारचा थरार ! उभ्या असलेल्या दुचाकींना उडविले, चार जखमी, एक गंभीर चार जखमी, एक गंभीर;साखरखेर्डा येथील घटना...

 
 साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव कारने बस स्थानकावर उभ्या करून ठेवलेल्या दुचाकींना उडविल्याची घटना ७ जुलै राेजी साखरखेर्डा येथील बस स्थानकावर घडली. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यापैकी एक जण गंभीर आहे. 

साखरखेर्डा येथील विज वितरण कंपनीचे कर्मचारी अरुण जैवळ हे लव्हाळा येथून एमएच २० बीएन २५२० या क्रमांकाच्या अल्टो कारने साखरखेर्डा येथे येत हाेते. दरम्यान, त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार उभ्या दुचाकींना उडविले. या अपघातात गवंडी काम करणारे दोन कामगार त्यात रवी जाधव सावंगीवीर हे गंभीर जखमी झाले. तर रवी जाधव सोबत असलेले अनिल भास्कर गवई यांच्याही पायाला जबरदस्त मार लागल्याने या दोघांवर साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाकी इतर युवकांना किरकोळ मार लागल्याने त्यांनी परस्पर खाजगी रुग्णालयात उपचार घेतले.