काळीज पिळवटून टाकणारी घटना! भीषण अपघात; टिप्परने दुचाकीला चिरडले; दोघे ठार! एक जखमी! संग्रामपूर तालुक्यातील घटना.....

 
 संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात काळीज पिळवून टाकणारा अपघात झाल्याची घटना आज दि.१७ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २८ बीबी ०८७५ क्रमाकांचे सहाचाकी टिप्पर मुरूम भरून वरवटच्या दिशेने येत होते. विरुद्ध दिशेने मोटारसायकलने तूर सोंगून ट्रिपल सीट तीन जण मनसगावकडे जात होते. दरम्यान त्या टिप्पर आणि मोटारसायकलचा जस्तगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की त्या तिघांपैकी एकाच्या शरीराचा चुरडा झाला. पुंजाजी श्रीराम बावणे असे मृतकाचे नाव आहे. तसेच संजय शालिग्राम बावणे यास शेगाव येथे उपचारासाठी नेतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. 
दुचाकी चालक ज्ञानेश्वर एकनाथ कोठे हा जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस स्टेशनचे पोहेकॉ बिट जमादार अशोक वावगे व पोकॉ विकास गव्हाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेचा पंचनामा करून मृतकास वरवट बकाल ग्रामीण रुग्णालय येथे श्वविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. टिप्पर चालकास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास तामगावं पोलीस करत आहे. वृत्त लिहपर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता...