समृद्धी महामार्गावर खळबळ! एकाच रात्री फुटले दहा गाड्यांचे टायर; एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला; दुसरबीड टोल नाक्याजवळचा प्रकार; टायर फुटण्याचे कारण धक्कादायक...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना वारंवार वाढत आहेत. यावरून समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेबाबत वारंवार सवाल उपस्थित केले जात आहेत. काल,१ एप्रिलच्या रात्री समृद्धी महामार्गावर अतिशय गंभीर प्रकार समोर आला. दुसर बीड टोल नाक्याजवळ असलेल्या एका पुलाचा अँगल तुटून वर आल्याने या अँगल मुळे तब्बल दहा गाड्यांचे टायर फुटून अपघात झाले.. सुदैवाने अनेक गाड्यांच्या एअर बॅग उघडल्याने जीवित हानी झाली नाही.
समृद्धी महामार्गाच्या दुसरबीड टोल नाक्याजवळ हा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका पुलाचा अँगल तुटून वर आला होता..या अँगलमुळे जवळपास दहा गाड्यांचे टायर फुटले. अनेक गाड्यांच्या एअर बॅग उघडल्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली आहे.. अपघातग्रस्त चालकांनी याची माहिती किनगाव राजा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या..