रक्तदान शिबिरावरून चिखलीत दोन गटांमध्ये हाणामारी; दोन्ही गटातील ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
शेख इसरारच्या दुकानासमोर १० सप्टेंबर रोजी रात्री त्याच्या वडिलांवर काहीजण धावून गेले. त्यावेळी शेख इसरारने अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शिवीगाळ करीत धमक्या दिल्या. त्यानंतर फरहान शेखला दुकानावर बोलावले असता वाद आणखी वाढला. काही वेळाने आरोपी पुन्हा दुकानासमोर जमा झाले आणि मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, उजेद अली खान (२०) यानेही परस्परविरोधी तक्रार दिली. त्यानुसार, रक्तदान शिबिरावरून वाद झाल्याने शेख निसार शेख कादर, शेख अनिस शेख कादर, शेख अतिक शेख रफिक, शेख इसरार शेख निसार, शेख तौफीक शेख रफिक, शेख रईस शेख अफसर, शेख सकलैन शेख अनिस, शेख जिशान शेख अनिस, शेख शाहरुख शेख हारुण, शेख अरबाज शेख अन्सार यांच्यासह इतर १० ते १५ जणांनी लोखंडी रॉड, चापटा व बुक्क्यांनी त्याला मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
तसेच, कायदा व सुव्यवस्था भंग झाल्याने पोलीस शिपाई मंगेश मोरे यांनी स्वतंत्र फिर्याद दिली असून, दोन्ही गटांतील आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.