शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेचा पाठलाग; "तुम्ही मला खूप आवडता..." म्हणत तरुणाची धक्कादायक हरकत!

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (३० जुलै) सकाळी सुमारे ८.४५ ते ८.५० वाजण्याच्या दरम्यान एका शाळेच्या परिसरात ही घटना घडली. फिर्यादी शिक्षिका शाळेकडे जात असताना आरोपी अकील अहमद अब्दुल अहमद (रा. चिखली) याने त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, आरोपीने शिक्षिकेला अडवून, "तुम्ही मला खूप आवडता, मला तुमच्याशी बोलायचे आहे,"

असे म्हणत त्यांच्याकडे मोबाईल क्रमांकाची मागणी केली. या प्रकारामुळे शिक्षिका घाबरल्या असून त्यांनी चिखली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून चिखली शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ६४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७८ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.