विवाहित महिला "लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार" झाल्याचा आरोप करू शकत नाही! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण! वाचा नेमके काय कारण...
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, जरी एखाद्या महिलेने लग्नाच्या खोट्या आश्वासनाच्या आधारे लैंगिक संबंध ठेवले असले तरी ती बलात्काराचा खटला दाखल करू शकत नाही. कारण ज्यावेळी कथित लैंगिक संबंध ठेवल्या गेले त्यावेळी ती आधीच विवाहित होती आणि दुसऱ्या लग्नासाठी पात्र नव्हती. हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम ५(i) नुसार जर एखाद्या व्यक्तीचा आधीच जिवंत जोडीदार असेल तर तो किंवा ती दुसरे लग्न करू शकत नाही. त्यामुळे युक्तिवादाच्या निमित्ताने असे गृहीत धरले गेले की "लग्नाचे खोटे वचन देऊन आरोपीने लैंगिक संबंध ठेवले" होते तरीही असे वचन कायदेशीरदृष्ट्या लागू होणार नाही आणि त्यावर कारवाई करता येणार नाही कारण कथित पीडिता स्वतः लग्नासाठी पात्र नव्हती..
म्हणून "बलात्काराच्या घटना कागदोपत्रीच" अधिक..
बुलडाणा जिल्ह्याच्या गुन्हेगारी जगतात गेल्या वर्षात मोठ्या संख्येत बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले. मात्र यापैकी बहुतांश बलात्काराचे गुन्हे हे विवाहबाह्य संबंधाशी आधारित होते, त्यात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार झाल्याचा आरोप होता..विवाहित महिलांनी अशा पद्धतीचे आरोप करणे चुकीचे असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे..त्यामुळे यातील बरेचशे बलात्कार हे कागदोपत्री बलात्कार ठरतात. आधी इश्क, नंतर सहमतीने शारीरिक संबंध,नंतर ब्रेक झाल्यावर मात्र "बलात्कार" अशा प्रकारच्या बलात्काराच्या गुन्ह्यांची संख्या देखील अधिक आहे.