BREAKING आ. गायकवाडांच्या विरोधात गुन्हा दाखल पण.....तरीही काँग्रेसचे ठिय्या आंदोलन सुरूच! काँग्रेस नेते म्हणतात, अदखलपात्र नको दखलपात्र गुन्हा दाखल करा...

 
Buldhana
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार संजय गायकवाड यांचे विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाख रुपयांचे बक्षीस केल्याचे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्र घेतला. दुपारी अडीच वाजेपासून बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात काँग्रेस नेत्यांनी ठिय्या मांडला आहे. "संजय गायकवाड यांच करायचं काय, खाली मुंडक वर पाय - गुन्हा दाखल झालाच पाहिजे" अशा घोषणा पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या दालनात देण्यात येत आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वीच आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र एवढ्यावर काँग्रेस नेत्यांचे समाधान झालेले नाही. जोपर्यंत दखलपात्र गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातच उपोषण करण्याचा इशारा काँग्रेस नेत्यांकडून देण्यात येत आहे. आमदार गायकवाड यांचे विरोधात भारतीय न्याय संहितेच्या ३५१ (२) ,३५१(४) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.