BREAKING शेगावात लाचखोर इंजिनियरच्या आवळल्या मुसक्या! NA करण्यासाठी मागितले १ लाख! ७५ हजार घेतांना रंगेहाथ पकडला...!
बुलढाणा येथील नगर रचना विभागाचे कनेक्शन काय? बुलडाणा ACB ची कारवाई
May 8, 2025, 13:32 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगावात एका लाचखोराला पैसे खातांना रंगेहाथ पकडले आहे. बुलढाणा येथील नगररचना विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत शेतीचे NA मंजूर करून देतो असे सांगत त्याने तक्रारदाराला १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती त्याने ७५ हजार रुपये घेतले, मात्र त्याचवेळी सापळा रचून बसलेल्या बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोराच्या मुसक्या आवळल्या. प्रशांत नामदेव बानोले (५३, रा. गांधी चौक, शेगाव) असे लाच खाणाऱ्याचे नाव आहे. बानोले व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्ध दिलेल्या पत्रकारानुसार तक्रारदाराला त्याच्या पत्नीच्या नावाने असलेल्या शेतीचे व्यावसायिकीकरण अकृषक (NA) करायचे होते. शेगावातील सिविल इंजिनियर प्रशांत बानोले याने आपले बुलढाणा येथील नगर रचना विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी संबंध असून त्यांच्यामार्फत NA प्रकरण मंजूर करू असे सांगितले होते. त्यासाठी त्याने १ लाख रुपयांची मागणी केली आहे. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली. ACB ने केलेल्या पडताळणी कारवाईत बानोले याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आले. बानोले याने तक्रारदाराकडून ७५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच ACB ने त्याच्या मुसक्या आवळल्या...
नगररचना विभागातील खादाड कोण?.
दरम्यान या प्रकरणात आरोपी प्रशांत बानोले याने बुलढाणा येथील नगररचना विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत काम करून देणार असल्याचे तक्रारदाराला सांगितले होते. त्यामुळे काम करून देणारा नगर रचना विभागातील तो खादाड कोण? प्रशांत बानोले याचे नगररचना भागातील कणाशी संबंध आहेत हा प्रश्न ऐरणीवर आला आहे...