५५ वर्षाचा भामटा..५ वर्षाच्या चिमुकली सोबत तसं करताना लाज नाही वाटली..! शेगाव तालुक्यातील संतापजनक घटना
Apr 6, 2026, 09:57 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातून अतिशय संताप जनक घटना समोर आली आहे. ही घटना तळपायाची आग मस्तकात नेणारी आहे.. समाजमन सुन्न करणारी आहे, तेवढीच काळीज पिळवटून टाकणारी आहे..५५ वर्षाच्या भामट्या म्हाताऱ्याने स्वतःच्या नातीच्या वयाच्या ५ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला..तिच्याशी अश्लील कृत्य केले.. याप्रकरणी आता आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
घटना शेगाव तालुक्यातील येऊलखेड येथील आहे. हे गाव शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते. घटना घडल्यानंतर पीडित मुलीने याबाबत तिच्या आईला सांगितले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. पीडित मुलगी आरोपीच्या घराजवळ असलेल्या झाडाचे बदाम वेचत होती..भर दुपारी त्यावेळी गल्लीत कुणी नव्हते. या संधीचा फायदा घेऊन आरोपी भगवान उत्तम खंडारे (५५) याने चिमुकलीला घरात बोलवून तुला पाच रुपये देतो असे म्हटले.
त्यानंतर मुलीसोबत अश्लील चाळे केले.मुलीला त्याच्या अवयवांना स्पर्श करायला लावला..घटनेनंतर दोन दिवसांनी चिमुकलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने आरोपीला या संदर्भात विचारणा केली असता आरोपीने चूक झाल्याची कबुली दिली..अखेर पीडित मुलीच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात हजर होऊन या प्रकरणाची तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपी विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.