नदीच्या काठावर ४२ वर्षीय महिलेसोबत दुष्कृत्य! म्हणे, तु मला आवडते..खाली पाडले अन्..! मलकापुरातील घटना
May 15, 2025, 08:46 IST
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर शहर पोलीस ठाण्यात एका ४२ वर्षे महिलेने लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली आहे. नदीच्या काठावर शौचाला गेली असता हा प्रकार घडला असल्याचे महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे...
तक्रारीनुसार पीडित महिला ही नदीच्या काठावरील असलेल्या शौचालयाकडे एकटी गेली होती. त्यावेळी आरोपी सागर किसन मोरे (रा. वाकोडी) याची नजर महिलेवर पडली. तो महिलेच्या मागोमाग तिथे आला.. "तू मला आवडलीस, तू माझ्यासोबत लग्न कर.. तुला लग्न करण्यास विरोध करत असतील तर आपण पळून जाऊन लग्न करू.." असे आरोपी सागर मोरे याने म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान महिलेने आरोपीला नकार दिला.त्यानंतर आरोपीने महिलेला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. खाली पाडून जबरदस्ती संभोग केला. या झटापटीत महिलेच्या गळ्यातील ४ ग्रॅमचे मंगळसूत्र ही त्याने हिसकावले. घडलेली घटना कुणाला सांगितल्यास जीवाने मारण्याची धमकी दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सागर मोरे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार आहे...