लग्नाचे आमिष दाखवून ३६ वर्षीय युवतीवर अत्याचार; शेगाव शहरात धक्कादायक घटना, आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल..!

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :लग्नाचे आमिष दाखवून एका ३६ वर्षीय युवतीवर शेगाव येथील गेस्ट हाऊसमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी खापरवाडी (ता. अकोट) येथील अमोल बाळकृष्ण आवारे याच्याविरुद्ध शेगाव शहर पोलिस ठाण्यात ८ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत पीडितेने नमूद केले आहे की, आरोपीने तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर पाच ते सहा वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार करून संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर दिशाभूल करून लग्नास नकार देत टाळाटाळ केली.
या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमोल बाळकृष्ण आवारे याच्याविरुद्ध अप क्र. ४८६/२०२५ भादंवि कलम ६९, भा. न्या. सं. २०२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि गजानन सोनटक्के करीत आहेत.