३६ वर्षाचा युवक..टोकाचा निर्णय घेतला! गणेशपुर येथील घटना....

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गणेशपूर येथील एका युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काल, ७फेब्रुवारी रोजी उघडकीस झाली आहे.
गाजेशपूर येथील जयश्राम सखाराम भालेराव (वय ३६) याने ७ फेब्रुवारी रोजी सकाळी राहत्या घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काही वेळाने उघडकीस आल्याने गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सदर युवकाने आत्महत्या कां?, केली याबाबत नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही...