३५ वर्षांचा युवक..शेतात गेला अन्....! शेलापुरात नेमकं काय घडलं! गावात हळहळ...

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील ३५ वर्षीय युवकाने भाडगणी शिवारातील एका शेतात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना काल रविवार ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सनी बारसु मोरे असे मृतकाचे नाव आहे.
शेलापूर नवीन येथील बारसु पांडुरंग मोरे यांनी बोराखेडी पोलिसात फिर्याद दिली की, त्यांचा मुलगा सनी बारसु मोरे वय (३५) याने भाडगणी शिवारातील अनिल पाटील यांच्या शेतात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. सदर युवक रविवार ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मृत अवस्थेत दिसून आला. अशा फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी कलम १९४ अन्वये मर्ग दाखल केला. युवकाच्या आत्महत्या का केली? याचे कारण मात्र समजू शकले नाही.