चिखलीच्या बस स्टँडवर २७ वर्षाचा तरुण आडोशाला अंधारात बसला होता लपून; करायचा होता कार्यक्रम पण तेवढ्यात..... मध्यरात्रीची घटना! नेमकं काय घडलं

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली बस स्टैंड वर अंधारात लपून बसलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एक तरुण बस स्टँड वर अंधारात आडोशाला लपून बसला होता. चिखली पोलिसांनी पेट्रोलिंग करतांना त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.. आनंद उर्फ पप्पू गुलाबराव अनपट (२७, रा. वॉर्ड न १९, नवनाथनगर, जाफ्राबाद रोड ,चिखली) असे आरोपीचे नाव आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पप्पू चिखली बस स्टँड वरील भारतीय जन औषधी केंद्राच्या आडोशाला अंधाराचा फायदा घेऊन लपून बसला होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेतले, त्यावेळी त्याला लपून बसण्याचे कारण विचारले असता त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याला वारंवार विचारणा करू नये तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे तो चोरी करण्याच्या उद्देशानेच लपून बसल्याचा संशय पोलिसांना आहे. चिखली पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ नुसार गुन्हा दाखल केला आहे..