80 हजारांच्‍या 2 गिरगायी चोरट्यांनी नेल्या..!; खामगाव तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः खामगाव तालुक्यातील टेंभूर्णा येथून 80 हजार रुपयांच्या 2 गिरगायी चोरट्यांनी नेल्या आहेत. या प्रकरणी शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शेतकरी नामदेव शालिग्राम बहाद्दरे (68, रा. टेंभुर्णा) यांनी तक्रार दिली की, त्यांनी गाव शिवारातील शेतात गोठा तयार केलेला आहे. रात्री गायींना राखण्यासाठी त्यांचा मुलगा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः खामगाव तालुक्‍यातील टेंभूर्णा येथून 80 हजार रुपयांच्‍या 2 गिरगायी चोरट्यांनी नेल्या आहेत. या प्रकरणी शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

शेतकरी नामदेव शालिग्राम बहाद्दरे (68, रा. टेंभुर्णा) यांनी तक्रार दिली की, त्‍यांनी गाव शिवारातील शेतात गोठा तयार केलेला आहे. रात्री गायींना राखण्यासाठी त्‍यांचा मुलगा राजू शेतात असतो. काल, 13 मे रोजी रात्री 8 ला तो शेतात गेला. पण त्‍याला गोठ्या गायी आढळल्‍या नाहीत. त्‍याने फोन करून कळवल्यानंतर नामदेव यांची दोन्ही मुले विजय आणि प्रवीण शेतात गेले. त्‍यांनी परिसरात शोध घेतला. पण गायी मिळून आल्या नाहीत. गाय चोरीला गेल्याची खात्री पटल्‍यानंतर नामदेव बहाद्दरे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.  तपास हेकाँ मनोज चव्‍हाण करत आहेत.