बुलडाण्यात ४८ तासांत ६ महिला-मुली बेपत्ता! चिखली, खामगाव, मोताळा हादरलं... पोलिसांसमोर आव्हान!
May 27, 2026, 19:03 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यात २५ आणि २६ मे २०२६ या फक्त दोन दिवसांत ६ महिला व मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
पोलीस ठाणेनिहाय बेपत्ता झालेल्यांची यादी:
१) अश्विनी सुधाकर हागे, (२१) वर्षे राहते घर, ग्राम बावनबीर,सोनाळा, २) कु. मालु संतोष अडागळे, (१९) वर्षे हिवरखेड, (खामगाव), ३) सौ. पायल ओम पुरी, (२३) वर्षे ,पिंपळगाव राजा रोड, घाटपुरी, ता. खामगाव, ४) शारदा संजय गव्हाळे, (२३) वर्ष तालखेड, ता. मोताळा .बोराखेडी, ५) श्वेता सुरेश सिरसाट, (२२) वर्षे बस स्टँड, चिखली ६) नर्मदा राजाराम ठेंग, (८८) वर्षे मकरध्वज खंडाळा, ता. चिखली
ठळक मुद्दे
एकूण ६ जणी बेपत्ता - यात १९ ते २३ वयोगटातील ५ तरुणी आणि १ वयोवृद्ध ८८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
खामगाव, चिखली, मोताळा, सोनाळा आणि हिवरखेड या ५ तालुक्यांमधील घटना आहेत.
पोलीस स्टेशन: शिवाजी नगर व चिखली पोलीस ठाण्यात प्रत्येकी २ तर सोनाळा, हिवरखेड, बोराखेडी येथे प्रत्येकी १ नोंद आहे.
एका मागोमाग एक समोर येणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पोलिसांचे आवाहन: वरील कोणत्याही महिलेबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ ११२ किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.