जळगाव जामोद परिसरात ५.४२ किलो गांजा जप्त; एका केली अटक;“मिशन परिवर्तन” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...
Updated: Nov 2, 2025, 11:43 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात राबविण्यात येत असलेल्या “मिशन परिवर्तन” मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (स्थागुशा) आणखी एक धाडसी कारवाई करत जळगाव जामोद परिसरात अवैध गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीस रंगेहात पकडले आहे. पोलिसांनी या आरोपीच्या ताब्यातून ५ किलो ४२ ग्रॅम गांजा आणि मोबाईल असा एकूण ₹१,१०,८४०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Advt👆🏻
पोलीस अधीक्षक निलेशतांबे यांनी जिल्ह्यात अंमलीपदार्थांची वाहतूक,साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानुसार दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी पोनि. सुनिल अंबुलकर, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा, हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पो.स्टे. जळगाव जामोद हद्दीत गस्त घालत असताना ग्राम पळशी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.
गस्तीदरम्यान पोलिसांना हॉटेलजवळ एक इसम हातात थैली घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्यास थांबवून तपासणी केली असता, त्याच्या पिशवीत गांजा अंमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर त्यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
अक्षय तेजराव कोकाटे (वय ३२ वर्षे, रा. पळशी सुपो, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा असे आरोपीचे नाव आहे.
त्याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत. आरोपीकडून
गांजा (५ किलो ४२ ग्रॅम) किंमत ₹१,००,८४० रुपये, मोबाईल — ₹१०,०००/ असा ₹१,१०,८४० रुपयांचा ऐवज जप्त केला.
“मिशन परिवर्तन” म्हणजे काय?
२६ जून २०२५ पासून जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “मिशन परिवर्तन” या विशेष मोहिमेअंतर्गत, बुलढाणा जिल्ह्यात अंमली पदार्थांचा शोध, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये कठोर कारवाई केली जात आहे. या मोहिमेमुळे अंमली पदार्थांच्या विक्रीवर प्रभावी नियंत्रण येत आहे.
ही यशस्वी कारवाई निलेश तांबे, पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा व अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाई पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली पार पडली असून, पथकात
पोउपनि. अविनाश जायभाये,
पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे,
राजेंद्र टेकाळे,शेख चाँद,
गणेश पाटील,पोकॉ. गजानन गोरले,चापोना. सुरेश भिसे,
निवृत्ती पुंड (स्थागुशा-बुलढाणा),
तसेच पोहेकॉ. राजु आडवे (तांत्रिक विश्लेषण विभाग, बुलढाणा) यांचा समावेश होता.
