विजेच्या धक्क्याने ५२ वर्षीय महिला मजुराचा मृत्यू; आव्हा शिवारातील दुर्दैवी घटना; दोन्ही पती-पत्नी दिव्यांग असल्याने हळहळ
दरम्यान, त्या ठिकाणी विद्युत प्रवाह असलेली तार जमिनीवर पडलेली होती. या तारेला कमलबाई भारती यांचा स्पर्श होताच त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सोबतच्या महिला दूर पळाल्यामुळे त्यांचा जीव वाचला.
मृत कमलबाई भारती या दिव्यांग होत्या, तसेच त्यांचे पती डिगंबर भारती हेही दिव्यांग असून हे कुटुंब भूमिहीन आहे. दोघेही मोलमजुरीवरच उदरनिर्वाह करीत होते. त्यामुळे या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर काही काळ घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शेतकरी व नागरिकांची गर्दी जमा झाल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागेश जायले, कोल्हीचे सरपंच शिवाजीराव बोराडे, माजी सभापती अवि पाटील, आव्हा सरपंच स्वप्नील घोंगटे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी समजूत काढून वातावरण शांत केले.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर येथे पाठवण्यात आला असून, या प्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) करण्यात आली आहे. दरम्यान, मृत महिलेच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
