उंबरखेडमध्ये ३५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; घरातच घेतला शेवटचा श्वास...

 
 देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :तालुक्यातील उंबरखेड येथे ३५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना १० ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. गणेश आनंदा कायंदे (वय ३५) असे मृतक युवकाचे नाव आहे.

मृतकाचा भाऊ अनिल कायंदे याने घरात प्रवेश करताच गणेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव राजा येथे तातडीने हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून गणेशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.


या घटनेची माहिती अनिल कायंदे यांनी तत्काळ देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहेत.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.