22 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या; बुलडाणा शहराजवळील घटना

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल, 19 एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास बुलडाणा शहराजवळील म्हाडाच्या क्वार्टर परिसरातील जंगलात घडली. रवी देवसिंग ठाकरे (रा. मिल्ट्री प्लॉट, जुनागाव) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पळसाच्या झाडाला रुमालाच्या सहाय्याने त्याने गळफास घेतला. आत्महत्येची माहिती विजय देवसिंग ठाकरे यांनी …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना काल, 19 एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसातच्‍या सुमारास बुलडाणा शहराजवळील म्हाडाच्या क्‍वार्टर परिसरातील जंगलात घडली.

रवी देवसिंग ठाकरे (रा. मिल्‍ट्री प्‍लॉट, जुनागाव) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. पळसाच्या झाडाला रुमालाच्या सहाय्याने त्‍याने गळफास घेतला. आत्‍महत्‍येची माहिती विजय देवसिंग ठाकरे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. तपास एएसआय अप्पाराव गवई करत आहेत.