तरोडा येथील २० वर्षीय युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; कोथळी शिवारातील घटना

 
 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मोताळा तालुक्यातील तरोडा गावातील २० वर्षीय युवकाने कोथळी शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना २८ एप्रिल रोजी उघडकीस आली असून, आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
मृतकाचे नाव नरेश तारासिंग मस्से (वय २०, रा. तरोडा) असे असून, त्याने कोथळी शिवारातील विहिरीत उडी घेतली. पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याबाबत करतारसिंग करपा मस्से यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. पुढील तपास नापोकाँ. श्रीकांत चिटवार करीत आहेत.