20 वर्षीय तरुणी पहाटे साडेपाचला घरातून बेपत्ता

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 20 वर्षीय तरुणी घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. ही घटना शिरजगाव देशमुख (ता. खामगाव) येथे 13 एप्रिलला पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. काल या प्रकरणात तिच्या वडिलांनी ती हरवल्याची तक्रार दिली.प्रल्हाद नारायण देशमुख यांनी तक्रार दिली, की त्यांची मुलगी वैष्णवी 13 एप्रिल रोजी पहाटे 5.30 …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 20 वर्षीय तरुणी घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. ही घटना शिरजगाव देशमुख (ता. खामगाव) येथे 13 एप्रिलला पहाटे साडेपाचच्‍या सुमारास घडली. काल या प्रकरणात तिच्‍या वडिलांनी ती हरवल्याची तक्रार दिली.
प्रल्हाद नारायण देशमुख यांनी तक्रार दिली, की त्‍यांची मुलगी वैष्णवी 13 एप्रिल रोजी पहाटे 5.30 च्या दरम्यान घरी कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली. तिचा नातेवाईक व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता मिळाली नाही. तपास खामगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.