17 वर्षीय मुलीने घेतले विष!; दाताळा येथील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 17 वर्षीय मुलीने विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, 1 जुलैला सायंकाळी पाचच्या सुमारास दाताळा (ता. मलकापूर) येथे समोर आली. साक्षी विनोद पाचपोळ असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तिने राहत्या घरी विष घेतले. नातेवाइकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 17 वर्षीय मुलीने विष घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना काल, 1 जुलैला सायंकाळी पाचच्‍या सुमारास दाताळा (ता. मलकापूर) येथे समोर आली.

साक्षी विनोद पाचपोळ असे आत्‍महत्‍या केलेल्या मुलीचे नाव आहे. तिने राहत्‍या घरी विष घेतले. नातेवाइकांच्‍या ही बाब लक्षात येताच त्‍यांनी तिला तातडीने उपजिल्हा रुग्‍णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.