

रात्रीचा १.. ती गच्चीवर झोपली होती; शेजारचा गच्चीवर चढला अन् .... संग्रामपूर तालुक्यात १७ वर्षे मुलीसोबत नको ते झालं...
Mar 21, 2025, 09:26 IST
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनाही वाढत आहेत. लैंगिक अत्याचाराच्या घटनांही थांबत नाही..दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे..एका १७ वर्षीय मुलीसोबत ४० वर्षीय नराधमाने नको ते केलं..रात्री १ वाजता हा प्रकार घडला..
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत घराच्या गच्चीवर झोपलेली होती. त्यावेळी घराच्या शेजारी राहणारा ४० वर्षीय नराधम गच्चीवर चढला. त्याने अल्पवयीन मुलीला वाईट उद्देशाने स्पर्श करीत विनयभंग केला.प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आलेली असून आरोपी विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.