२८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, १७ ऑगस्ट रोजी सकाळी बिरसिंगपूर (ता. बुलडाणा) येथे उघडकीस आली. समाधान सुधाकर जाधव (रा. बिरसिंगपूर, ता. बुलडाणा) या विवाहित तरुणाने रात्रीदरम्यान गळफास घेतला. बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. समाधान …
 
२८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, १७ ऑगस्ट रोजी सकाळी बिरसिंगपूर (ता. बुलडाणा) येथे उघडकीस आली.

समाधान सुधाकर जाधव (रा. बिरसिंगपूर, ता. बुलडाणा) या विवाहित तरुणाने रात्रीदरम्यान गळफास घेतला. बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. समाधान यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. वृत्त लिहीपर्यंत समाधानच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.