सुसाईड नोट वाचून दगडालाही पाझर फुटेल! उलट्या काळजाच्या सरकारला फुटेल का पाझर? कैलास नागरे लिहितात,माझी "आहुती" हमी पाण्यासाठी; मलाच आरोपी करा, माझ्यावरच ३०२ दाखल करा, कारण....
Mar 13, 2025, 12:51 IST
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतीला पाणी मिळावे, खडकपूर्णा धरणातील पाणी शिवणी आरमाळ, गुंजाळा, अंढेरा, मेंढगाव, अंचरवाडी या पाझर तलावांमध्ये सोडण्यात यावे या मागणीसाठी शिवणी आरमाळ येथील युवा शेतकरी कैलास नागरे यांनी डिसेंबर महिन्यात अन्नत्याग आंदोलन केले होते. शासनाने आश्वासन दिल्यानंतर नागरे यांनी उपोषण स्थगित केले मात्र शासनाने शब्द पाळला नाही. त्यामुळे कैलास नागरे यांनी हतबल होऊन आज,१३ मार्च रोजी विषारी औषध प्राशन करून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आत्मबलिदान केले. कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोट मधील शब्द वाचून कुण्याही संवेदनशील मानाच्या माणसाला पाझर फुटेल..एवढेच काय दगडालाही पाझर फुटेल.. मात्र उलट्या काळजाच्या प्रशासकीय यंत्रणेला, सरकारला पाझर फुटेल का? असा सवाल आता उपस्थित होत आहे..

Advt 👆
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कैलास नागरे यांनी आपल्या मुलांचे पालकत्व सरकारने स्वीकारावे असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार खासदारांना उद्देशून दिले आहे. "पाण्याअभावी एक साल बुडल, की पुन्हा दोन वर्ष घडी बसत नाही,असेच साल बुडत राहिले तर मग पर्याय काय?" असा उद्विग्न सवाल यंत्रणेला केला आहे. त्यामुळे "आहुती" निश्चित आहे हे मला समजत होते. हा निर्णय माझा सर्वस्वी आहे. कोणालाच आरोपी करू नका, मलाच आरोपी करा..कारण मी जरी आहुती देत असलो हमी पाण्यासाठी तरी माझ्या बहिणीचा, भाऊजीचा वडिलांचा मुलांचा, माझ्या, भाचीचा,बायकोचा, नातेवाईकांचा सासू-सासरे साले मित्र, भाऊ, आई, आप्तेष्टांचा बळी घेऊन राहिलो म्हणून माझ्यावरच कृपया गुन्हा दाखल करा.३०२ गुन्हा दाखल करा असे कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले आहे..