सिंदखेड राजात लव्ह जिहादचा प्रकार!; १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्‍या जाळ्यात फासून पळवले!!; बिबी पोलिसांत तक्रार दाखल

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यात लव्ह जिहादचा प्रकार समोर आला आहे. १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फासून २४ वर्षीय जेबीसी ऑपरेटरने पळवून नेले. पळवून नेताना तिच्या लहान बहिणीला कुणाला सांगितल्यास जीवे मारून टाकीन, अशी धमकीही दिली. ही घटना ताडशिवणी (ता. सिंदखेड राजा) येथे काल, १४ जूनच्या सायंकाळी घडली. पीर मोहम्मद छोटू …
 
सिंदखेड राजात लव्ह जिहादचा प्रकार!; १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्‍या जाळ्यात फासून पळवले!!; बिबी पोलिसांत तक्रार दाखल

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्‍यात लव्‍ह जिहादचा प्रकार समोर आला आहे. १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्‍या जाळ्यात फासून २४ वर्षीय जेबीसी ऑपरेटरने पळवून नेले. पळवून नेताना तिच्‍या लहान बहिणीला कुणाला सांगितल्यास जीवे मारून टाकीन, अशी धमकीही दिली. ही घटना ताडशिवणी (ता. सिंदखेड राजा) येथे काल, १४ जूनच्‍या सायंकाळी घडली.

पीर मोहम्मद छोटू (रा. पुरखास, ता कोसंबी, जि. संभल, उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. तो वर्षभरापासून ताडशिवणीत आला होता. गावातीलच एका जेसीबीवर तो ऑपरेटरचे काम करत होता. या दरम्यान त्याची ओळख पीडित अल्पवयीन मुलीशी झाली. मुलीला प्रेमाच्‍या जाळ्यात अडकवून त्‍याने तिला पळवून नेण्याचा कट आखला. काल सायंकाळी त्‍याने तिच्या घरून तिला पळवून नेले.

मुलीच्या लहान बहिणीस धमकी दिली की तू जर कोणाला सांगितले तर जीवे मारून टाकीन. घडलेला प्रकार पीडितेच्‍या लहान बहिणीने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी बिबी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पीर महोम्मद छोटूविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यातून तरुणी, महिला बेपत्ता होण्याच्‍या घटना वाढल्‍या आहेत. त्‍यातच ही लव्‍ह जिहादसारखी घटना समोर अाल्याने सिंदखेड राजा तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.