सासऱ्याने जावयाला बेदम चोपले; दगडाने मारून जखमी केले; देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खल्याळ गव्हाण (ता. देऊळगाव राजा) येथे सासरा व जावई यांच्यात जोरदार हाणामारी होऊन सासऱ्याने जावयाला दगडाने मारून जखमी केले. या प्रकरणी जावयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. संतोष पंडित कांबळे (३५, रा. कुंभारझरी ता जाफराबाद, जि. जालना) याचे देऊळगाव राजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण येथील मामाच्या मुलीसोबत …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  खल्याळ गव्हाण (ता. देऊळगाव राजा)  येथे सासरा व जावई यांच्यात जोरदार हाणामारी होऊन सासऱ्याने जावयाला दगडाने मारून जखमी केले. या प्रकरणी जावयाच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

संतोष पंडित कांबळे (३५, रा. कुंभारझरी ता जाफराबाद, जि. जालना) याचे देऊळगाव राजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण येथील मामाच्या मुलीसोबत लग्‍न झाले होते. संतोष 28  एप्रिलला सासरवाडीत आला असता सासरकडील मंडळीने आमच्या मुलीचे सोन्याचे दागिने परत द्या, असे म्हणत जावयासोबत वाद घातला. संतोषने दागिणे देण्यास नकार दिल्‍याने काशिनाथ गायकवाड व मच्छिंद्र गायकवाड यांनी त्‍याला मारहाण करत दगडाने मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. संतोषच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी काशिनाथ आणि मच्‍छिंद्र यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.