सरपंचबाईला रस्‍त्‍यात अडवून म्‍हणाला मला तुझी एक रात्र दे… शेगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरपंचबाईला रस्त्यात अडवून “तू मला तुझी एक रात्र दे, मग मी काही करणार नाही’ असे बोलून छेड काढणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याविरुद्ध जलंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जलंब पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावात घडली. (पीडित सरपंचबाईंची ओळख उघड होऊ नये म्हणून गावाचा नामोल्लेख टाळला आहे, याची …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरपंचबाईला रस्‍त्‍यात अडवून “तू मला तुझी एक रात्र दे, मग मी काही करणार नाही’ असे बोलून छेड काढणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याविरुद्ध जलंब पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना जलंब पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावात घडली. (पीडित सरपंचबाईंची ओळख उघड होऊ नये म्‍हणून गावाचा नामोल्लेख टाळला आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी.)

शिवदास हरीदास पारस्कर असे छेड काढणाऱ्या युवकाचे नाव असून, तो ग्रामपंचायत सदस्य आहे. त्‍याच्‍याविरुद्ध २५ वर्षीय सरपंचबाईंनी तक्रार दिली आहे. काल, ३० जुलैच्‍या सकाळी ११ च्‍या सुमारास ही घटना घडली. रात्री दहा वाजता या प्रकरणात गुन्‍हा दाखल झाला. ग्रामपंचायतीची बैठक सुरू असताना शिवदास तिथे आला व बैठकीचे चित्रिकरण करू लागला. त्‍यावरून सरपंचबाईंनी त्‍याला शूटिंग का करतो असे विचारले. त्‍यावरून त्‍याने त्‍यांच्‍याशी वाद घातला. तुझे ग्रामपंचायतीचे एकही काम होऊ देणार नाही, अशी धमकीही त्‍याने दिली. सरपंचबाई घरी जात असताना शिवदासने त्‍यांचा रस्‍ता अडवला व “तू मले तुझी एक रात्र दे, मग मी काही करणार नाही’ असे म्‍हणून छेड काढली. यावेळी सरपंचबाईंनी विरोध केल्याने अश्लील शिविगाळही केली. तपास पोहेकाँ सुपडासिंग चव्हाण करत आहेत.