सण, उत्‍सव, जयंती उत्‍साहात परंतु साधेपणाने साजरे करा; नांदुऱ्यात शांतता समितीची बैठक

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आगामी काळातील सण, उत्सव व महापुरुषांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर काल, 10 एप्रिलला नांदुरा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जयंती, सण, उत्सव, साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. तडवी यांनी केले. तहसीलदार राहुल तायडे, ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनीही मार्गदर्शन केले. …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आगामी काळातील सण, उत्‍सव व महापुरुषांच्‍या जयंतीच्‍या पार्श्वभूमीवर काल, 10 एप्रिलला नांदुरा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जयंती, सण, उत्‍सव, साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. तडवी यांनी केले.

तहसीलदार राहुल तायडे, ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनीही मार्गदर्शन केले. उत्सव उत्साहाने मात्र साधेपणाने शासनाने ठरवून दिलेल्या दिशा निर्देशानुसार साजरे करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. यावेळी शहरातील शांतता कमिटी सदस्य मुज्जमिल अली खान, सुरेश पेठकर, गणेश वानखडे, राजू वाकोडे, शेख अन्‍वर, शेख बाबा, मुक्तार सेठ, देवा वाकोडे, कुणाल वाकोडे, प्रकाश बर्डे, शुभम भिडे, अर्जुन वाकोडे आदी उपस्‍थित होते, असे पोलीस प्रशासनाच्या वतीने बुलडाणा लाईव्हला कळविण्यात आले.