सकाळी कॉलेज जातो म्हणाला, रात्री व्हाॅट्स ॲप मॅसेज करून म्हणाला, मी बीडमध्ये आहे… नंतर फोन झाला बंद; अपहरणाचा संशय!, मोताळा तालुक्यातील धक्‍कादायक घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात २६ जुलै रोजी केली आहे. पोलिसांनी अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोताळा तालुक्यातील पुन्हई येथील शंकर गणपत शिंदे (४५)यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा कल्पेश्वर २२ जुलैला सकाळी साडेसात वाजता बोराखेडी येथे शाळेत पेपर आहे, असे सांगून घरून निघून …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात २६ जुलै रोजी केली आहे. पोलिसांनी अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोताळा तालुक्यातील पुन्हई येथील शंकर गणपत शिंदे (४५)यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा कल्पेश्वर २२ जुलैला सकाळी साडेसात वाजता बोराखेडी येथे शाळेत पेपर आहे, असे सांगून घरून निघून गेला. दुपारी वडिलांनी फोन लावला असता फोन लागला नाही. रात्री कल्पेश्वरने वडिलांना व्हाॅट्स ॲपवर मेसेज केला की “मी बीड मध्ये आहे. तुम्ही टेंशन घेऊ नका, ती तिच्या घरी आहे, तिला नाही आणत’. त्याला फोन करून बघितला असता फोन बंद होता. २२ ते २६ जुलैपर्यंत त्याचा नातेवाइक, मित्रमंडळी सगळीकडे शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून न आल्याने शिंदे यांनी बोराखेडी पोलिसांत धाव घेतली. माझ्या मुलाला कुणीतरी पळवून नेले वा अपहरण केले, अशी तक्रार दिली.