शेतात आईसाठी जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील नवीन भोन येथील अल्पवयीन मुलगी शेतातील धुऱ्यावरून जात असताना दोघांनी वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला. ही घटना १८ जुलैला घडली. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी काल, १९ जुलैला रात्री उशीरा पीडित मुलीच्या लेखी तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच दोघे आरोपी फरारी आहेत. नवीन भोन येथील अल्पवयीन …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील नवीन भोन येथील अल्पवयीन मुलगी शेतातील धुऱ्यावरून जात असताना दोघांनी वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला. ही घटना १८ जुलैला घडली. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी काल, १९ जुलैला रात्री उशीरा पीडित मुलीच्या लेखी तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. गुन्‍हा दाखल होताच दोघे आरोपी फरारी आहेत.

नवीन भोन येथील अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे व आरोपीचे शेत शेजारी असून, अल्पवयीन मुलगी शेतात काम करत असलेल्या आईसाठी जेवणाचा डबा धुऱ्यावरून घेऊत जात होती. तेव्‍हा दिनकर नत्थु जमाव व गोपाल दिनकर जमाव यांनी वाईट उद्देशाने तिचा हात धरला. मुलीच्या ओडण्याचा आवाज शेतात काम करत असलेल्या आई व मोठे वडिलांच्या कानावर पडताच त्‍यांनी तिच्‍याकडे धाव घेतली. त्‍यामुळे दोन्ही आरोपी पसार झाले. पीडितेच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक श्रीकांत विखे करत आहेत.