शेतातच शेतकऱ्याने घेतला गळफास; सिंदखेड राजा तालुक्‍यातील घटना

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील रुम्हणा येथील मधुकर आश्रुबा खेडकर (55) यांनी आज, 1 मार्च रोजी सकाळी ७ च्या सुमारास तांदूळवाडी शिवारातील गट नंबर 59 या त्यांच्या मालकीच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.खेडकर हे लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचे चुलतभाऊ कारभारी नारायण खेडकर (37) यांना सकाळी दिसले. …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील रुम्हणा येथील मधुकर आश्रुबा खेडकर (55) यांनी आज, 1 मार्च रोजी सकाळी ७ च्‍या सुमारास तांदूळवाडी शिवारातील गट नंबर 59 या त्यांच्या मालकीच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
खेडकर हे लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचे चुलतभाऊ कारभारी नारायण खेडकर (37) यांना सकाळी दिसले. त्‍यांनी तातडीने किनगाव राजा पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्‍थळी येत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. मृतकाकडे सुसाईड नोट सापडल्याची माहिती मिळत आहे. तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. अनिल खार्डे, पो.काँ. नाजीम चौधरी करीत आहेत.