शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्‍महत्‍या; नांदुरा तालुक्‍यातील घटना

जलंब , ता. शेगाव (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वतःच्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना भोटा शिवारात (ता. नांदुरा) आज, 7 मार्चच्या सकाळी साडेआठला समोर आली. नामदेव किसन पारसकार (38, रा. भोटा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती प्रमोद शत्रुघ्न पारसकार (35, रा. भोटा) यांनी जलंब …
 

जलंब , ता. शेगाव (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः स्‍वतःच्‍या शेतात निंबाच्‍या झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्‍महत्‍या केल्याची घटना भोटा शिवारात (ता. नांदुरा) आज, 7 मार्चच्‍या सकाळी साडेआठला समोर आली.

नामदेव किसन पारसकार (38, रा. भोटा) असे आत्‍महत्‍या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती प्रमोद शत्रुघ्न पारसकार (35, रा. भोटा) यांनी जलंब पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तपास पोहेवा श्री. इंगळे करत आहेत.