शेगावमध्ये शिव गारमेंट, भाग्‍योदय ट्रेडर्सच्‍या मालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकार्यांचे मनाई आदेश असतानाही या आदेशाचा भंग करून दुकान उघडे ठेवणाऱ्या शिव गारमेंट व भाग्योदय ट्रेडर्स या दोन्ही दुकान मालकांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी आज, 27 मे रोजी गुन्हा दाखल केला. ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना शेगाव बसस्थानकासमोर असलेले शिव गारमेंट कपड्याचे …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकार्‍यांचे मनाई आदेश असतानाही या आदेशाचा भंग करून दुकान उघडे ठेवणाऱ्या शिव गारमेंट व भाग्योदय ट्रेडर्स या दोन्ही दुकान मालकांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी आज, 27 मे रोजी गुन्हा दाखल केला.

ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना शेगाव बसस्थानकासमोर असलेले शिव गारमेंट कपड्याचे दुकान सुरू दिसले. दुकानमालक विकी राजकुमार रावलानी दुकानात ग्राहकी करत होता. तोंडावर कोणतेही मास्क न लावता दुकानात सहा ते सात ग्राहक मिळून आले. त्याचप्रमाणे आठवडी बाजार परिसरातील भाग्योदय ट्रेडर्सही सुरू असल्याचे दिसून आले. त्‍यामुळे शिव गारमेंटचा मालक विकी रावलानी (33, रा. लखपती गल्ली) व भाग्योदय ट्रेडर्सचे मालक शरद वासुदेव मसने (५४, रा. श्रीरामनगर, शेगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.