विश्वासघात! अकाऊंटंटने केला अर्ध्या कोटीचा घपला!!; मलकापूर येथील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः अकाऊंटंटने दुकानमालकाचा विश्वासघात केला. दुकानमालकाच्या खात्यातील तब्बल 51 लाख 76 हजार 600 रुपये त्याने आपल्या खात्यात वळवून घेतले. ही बाब समोर येताच दुकानमालकाने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली असून, अकाऊंटंटविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याला काल, 30 मे रोजी अटक करण्यात आली होती. आज, 31 मे …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः अकाऊंटंटने दुकानमालकाचा विश्वासघात केला. दुकानमालकाच्‍या खात्‍यातील तब्‍बल 51 लाख 76 हजार 600 रुपये त्‍याने आपल्या खात्यात वळवून घेतले. ही बाब समोर येताच दुकानमालकाने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली असून, अकाऊंटंटविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला. त्‍याला काल, 30 मे रोजी अटक करण्यात आली होती. आज, 31 मे रोजी न्‍यायालयात हजर केले असता 3 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्‍यायालयाने दिले.

मोहन मधुकर मुजुमदार (41, रा. हरीकिरण सोसायटी, मलकापूर) असे या अकाऊंटंटचे नाव आहे. त्‍याच्‍याविरुद्ध रूद्रा अँग्रो सेंटरचे मालक प्रकाश वासुदेव पाटील (37, रा. धरणगाव, ता. मलकापूर) यांनी तक्रार दिली. पाटील यांचे धरणगावला रूद्रा अॅग्रो सेंटर आहे. मे 2018 ते एप्रिल 2020 च्‍या दरम्यान मुजुमदार पाटील यांच्‍याकडे कामाला होता. तो त्‍यांचे बँकेचे सर्व व्यवहार सांभाळत होता.

त्‍याने पाटील यांचा विश्वास संपादन करून त्‍यांचे एचडीएफसी, मलकापूर अर्बन, अॅक्सीस, बँक आँफ इंडिया आदी बँक खात्यातून वेळोवेळी स्‍वतःच्‍या खात्‍यात पैसे वळते करून घेतले. यासाठी त्‍याने पाटील यांच्‍या सहीचे चेक (सेल्फ/ बेरर) वापरले. ही बाब लक्षात आल्यानंतर पाटील यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्‍यावरून मलकापूर शहर पोलिसांनी मुजुमदारविरुद्ध गुन्‍हा दाखल केला तपास पोलीस उपनिरिक्षक संजय ठाकरे करत आहेत.